सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी आली जाग, शाळेच्या जतनासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला पुढाकार
पुणे : पुरोगामी महाराष्ट्राच्या उभारणीत आणि मुलींच्या शिक्षणाची मुर्हुतमेढ रोवणात महत्वाचे योगदान असलेल्या ज्योतिबा फुले- सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात पहिली मुलींसाठी शाळा सुरु केली. मात्र आता या भिडे वाड्याकडे पुणे महानगरपालिका आणि राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने मोडकळीस आली असल्याने येथील शाळा बंद पडली आहे. अखेर सावित्रीबाईंच्या जयंती दिनी राज्य सरकारला जाग आली असून या इमारतीची आणि त्यातील शाळेच्या जतनासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पुढाकार घेत भिडे वाड्याचे जतन करणार असल्याची घोषणा केली.
पाच वर्षापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या वेळी पुण्यातील भिडे वाड्याचे जतन करण्याची घोषणा त्यावेळचे मंत्री छगन भुजबळ यांनी करत त्याची जबाबदारी पुणे महानगरपालिकेकडे सोपविण्यात आली. पुणे महानगरपालिकेतील भाजपाच्या सत्ताधाऱ्यांना कदाचित भिडे वाड्यातील फुले दांपत्यांनी सुरु केलेल्या शाळेचे महत्व वाटले नसल्याने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. या वाड्यातील इमारतीकडे दुर्लक्ष केल्याने ही इमारत मोडकळीस आली असून तीची दुरूस्ती करणे गरजेचे बनले आहे.
492 total views, 3 views today