कैलास चिंधु वेखंडे यांची ठुणे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच पदावर बिनविरोध निवड

कैलास वेखंडे हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असतांना त्यांनी केलेली विकासकामे ही उल्लेखनीय आहेत

शहापूर : शहापूर तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या ठुणे गृप ग्रामपंचायतीची आज उपसरपंच पदासाठी निवडणुक पार पडली. या निवडणुकीमुळे किन्हवली जिल्हा परिषद गटाच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या कांचन साबळे व युवाउद्योजक तथा युवा सेनेचे उभरते नेतृत्व अविनाशदादा साबळे यांच्या कार्यपध्दतीची झलक पुन्हा एकदा पहायला मिळाली. अविनाश साबळे यांच्या अथक प्रयत्नांनी त्याचे निकटवर्तीय समजले जाणारे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य कैलास चिंधु वेखंडे यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली.
कैलास वेखंडे यांच्या निवडीने ठुणे पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.कैलास वेखंडे हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असतांना त्यांनी केलेली विकासकामे ही उल्लेखनीय आहेत. त्यामुळे समस्त ग्रामस्थांच्या आशा पल्लवित होऊन समाधान व्यक्त केले जात आहे.
कैलास वेखंडे यांचे अभिनंदन करण्यासाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा,शिवसेनेचे तालुका प्रमुख मारुती धिर्डे,संघटक संतोष शिंदे,उपतालुका प्रमुख विकास गगे,मधुकर वेखंडे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

 577 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.