“अ”प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांनी सांगितले की, अनाधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरू असुन तीन दिवसापूर्वी संदर्भीत तक्रारदारांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला असुन अर्जाची शाहनिशा करीत तक्रारीतील अनाधिकृत बांधकामावर निष्कसनाची कारवाई करण्यात येईल.”
कल्याण : “अ”प्रभागक्षेत्रात अनाधिकृत बांधकामे पडण्याची कारवाई सुरु असली अनाधिकृत बांधकामाबाबत तक्रार करून देखील मोर्यानगर टिटवाळा परिसरातील अनाधिकृत बांधकामावर कारवाई होत नसल्याचा आरोप तक्रारदारांने केला आहे.
मौजे टिटवाळा समाईक मालकी हक्काच्या व प्रत्यक्ष कब्जा वहिवाटीच्या सर्व्हे क्रं १४५ / ४/ ब, क्षेत्र ०२ हेक्टर ०४ आर.प्रती आणि सर्व्हे क्रंमाक व उपविभाग क्रं१२/२, क्षेत्र००हेक्टर ५२आर६०प्रती या जागेत गैरतक्रारदार यांनी आपसात संगनमत करून अनाधिकृत बांधकाम करून तक्रारदारांची जागा हडप करण्याचा प्रकार घडत असल्याने गैरतक्रारदार यांना तक्रारदारांच्या जागेत अशा प्रकारे अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम करण्याचा कोणताही हक्क अधिकार नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
तक्रारदार मागासवर्गीय असल्याने गैरतक्रारदार तक्रारदाराच्या असहाय्यतेचा गैरफायदा उठवून व बळाचा वापर करून सदरचे बेकायदेशीर बांधकाम करून तक्रारदारांची जागा हडप करण्याचे इराद्यात आहे. तक्रारदारांच्या सामाईक मालकीच्या जागे संबंधी न्यायालयात खटले न्याय प्रविष्ठ आहेत. या तक्रारीची गांभीर्यपूर्वक दखल घेवून गैरतक्रारदार यांच्या विरूद्ध वेळीच योग्य ती कायदेशीर व प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी अशी मागणी क.डो.मपा आयुक्त, प्रभागक्षेत्र आधिकारी “अ” प्रभागक्षेत्र, वरिष्ठ पोलिस निरीक्षक टिटवाळा पोलीस स्टेशन, यांना निवेदन देत तक्रारदार अनुसयाबाई महादू जाधव, भगवान बाबू जाधव , बंधू वामन पवार यांनी केली आहे.
दरम्यान याबाबत “अ”प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अनाधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरू असुन तीन दिवसापूर्वी संदर्भीत तक्रारदारांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला असुन अर्जाची शाहनिशा करीत तक्रारीतील अनाधिकृत बांधकामावर निष्कसनाची कारवाई करण्यात येईल.”
494 total views, 2 views today