नगरसेवक मनोहर डुंबरे यांचा सत्ताधाऱ्यांना उद्दिग्न सवाल
ठाणे : अख्ख्या ठाण्यात भरपूर पाणी आहे. पण आपल्या पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्रांड आणि कोलशेतलाच पाणी नाही, अशी खोटी बोंब मारणाऱ्यांचीच महापालिकेत सत्ता आहे. सत्ता शिवसेनेची, पण पाणी अडवतो भाजपा, असे यांना म्हणायचे आहे का? असा सवाल नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी विचारला आहे. शिवसेनेच्या महापौरांनी आता वाढीव पाणी मिळालेच, अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली. पण कुठे माशी शिंकली हे त्यांनाच माहित! भाजपा दोन वर्षांपासून दाद मागतोय. आता पाणीटंचाई दूर करण्याचे श्रेय घेण्यासाठी नाटक का करीत आहात? केवळ जनतेची दिशाभूल करण्याचाच यांचा हा उद्योग… २५ वर्ष महापालिकेत सत्ता शिवसेनेची, पण स्वतंत्र धरण उभारण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत. घोडबंदरवासियांच्या पाण्यासाठी फरफटीला जबाबदार कोण? शेवटी ये पब्लिक है सब जानती है… हे नक्की असे डुंबरे म्हणाले.
546 total views, 1 views today