गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे “चूल आंदोलन”

महिला कार्यकर्त्यांनी शेणाच्या गोवऱ्यांवर चूल पेटवून त्यावर भाकऱ्या भाजून केंद्र सरकारचा अनोख्या पद्धतीने आंदोलन करत केला निषेध

ठाणे : केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डाॅ जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाणे शहराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने रविवारी ठाण्यात “चूल आंदोलन” करण्यात आले. महिला कार्यकर्त्यांनी शेणाच्या गोवऱ्यांवर चूल पेटवून त्यावर भाकऱ्या भाजून केंद्र सरकारचा निषेध करत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यापासून भारतीय जनता पक्षाचे सरकारने सातत्याने गॅस दरवाढ केलेली आहे. सत्तेत आल्यानंतर जीवनाश्यक वस्तूंचे दर पाच वर्षे स्थिर राहतील, महिलांना स्वतंत्र वाहतूक व्यवस्था देऊ, महिलांच्या सुरक्षितेसाठी उपाययोजना करू अशी अनेक आश्वासने भाजपने महिला वर्गाला दिली होती. मात्र प्रत्यक्षात कोणताही शब्द भाजपने पाळला नाही. या गॅस दरवाढीमुळे महिलांचे स्वयंपाकाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे, आता महिलाच या सरकारची विकेट घेतील, अशा शब्दात पक्षाच्या महिला शहर कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांनी निषेध केला.
या आंदोलनात महिला शहर ठाणे जिल्हा महिला ब्लॉक अध्यक्षा ज्योती निंबर्गी, भानुमती पाटील, माधुरी सोनार तसेच महिला पदाधिकारी अनुश्री देशमुख, मंजू येरूनकार, स्मिता परकर, सबिया दीदी, अपर्णा पाटील, बलीयताई, शुभांगी कोलपकर, वंदना हुंडारे, वंदना लांडगे, सुवर्ण खिलारे, हाजी बेगम, गायत्री आर्यमाने, मंदाकिनी, रासकर, स्वाती टिळक, नीलम गायकवाड, सखींना खान, वनिता भोर, तबस्मुन, संगीत पालेकर, सुजाता गायकवाड, सुजाता घाग, शैलजा पवार आदी कार्यकर्त्यां सहभागी झाल्या होत्या.

 401 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.