अटलबिहारी वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त ऍड संदीप लेले यांनी राबवला अनोखा उपक्रम
ठाणे : भारतरत्न आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपचे प्रदेश सचिव आणि ठाणे महापालिकेचे नगरसेवक ऍड संदीप लेले यांनी कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांचा शुक्रवारी सत्कार केला.यावेळी लेखक विद्याधर ठाणेकर उपस्थित होते.
सध्या संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग पाहता संदीप लेले यांनी जास्त गर्दीचे कार्यक्रम न करता ठाणे शहरात वास्तव्य करणाऱ्या आणि कामकाज करणाऱ्या कवी ,साहित्यिक, दिग्दर्शक या सर्वांचा त्यांच्या निवासस्थानी व कामाच्या ठिकाणी जाऊन सत्कार केला. पंचागकर्ते दा.कृ. सोमण, कवी प्रवीण दवणे वृत्तनिवेदीका वासंती वर्तक, लेखक चांगदेव काळे, नाट्यकर्मी अशोक समेळ नात्यादिग्दर्शक ज्ञानेश महाराव नात्यादिग्दर्शक , संतोष पवार ,, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते अशोक चिटणीस श्वास या मराठी चित्रपटाच्या लेखिका माधवी घारपुरे या सर्वांचा शाल,श्रीफळ आणि वाजपेयींचे पुस्तक देऊन सत्कार केला.
ऍड संदीप लेले यांनी हा अनोखा उपक्रम राबवून साहित्यिक, नाट्यकर्मी यांच्याप्रती आदर व्यक्त केल्याने कलावंतांनी समाधान व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष सागर भदे,ठाणे शहर सचिव गौरव सिंग, उद्योजक हर्षराज नारंग, सचिन केदारी यांनी सहभाग घेतला
403 total views, 1 views today