चाळीसगाव येथे राहणारे सोनवणे कल्याण रेल्वे स्थानकातून हरवले असल्याचा अंदाज
ठाणे : डोंबिवली लोहमार्ग स्थानक ठाणे हद्दीमध्ये मुरलीधर सोनावणे (८१) हे मूळचे चाळीसगाव येथे राहणारे असून रेल्वेने प्रवास करताना डोंबिवली रेल्वे स्थानक येथे १० डिसेंबर रोजी उतरले आणि तेथून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या रेल्वेत चढले त्यानंतर त्यांचा शोध घेतला असता ते बेपत्ता झाले आहेत. यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानक येथे मुरलीधर सोनावणे हे हरवल्याची तक्रार हेमंत मुरलीधर यांनी केली असून या ज्येष्ठ नागरिकाचा लोहमार्ग पोलीस शोध घेत आहेत. यामुळे सदर व्यक्ती कुठे आढळले तर मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली रेल्वे स्थानक येथील ०२५१-२४९६४८४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
575 total views, 1 views today