संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अवैधरित्या दारू बाळगणाऱ्या, विक्री करणाऱ्या कल्याण शहर तसेच ग्रामीण परिसरातील २ धाबे, २ चायनीज दुकाने, तसेच कल्याण शहर भागात औवध रित्या दारु वाहतूक करणाऱ्या १ दुचाकी वाहनास, १ औवध हुक्कापार्लरवर उचलला कारवाईचा बडगा

कल्याण : कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी राज्य सरकारने रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी असतानाही धाबे, चायनीज कॉर्नर आणि अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कल्याण दारू बंदी उत्पादन शुल्क विभाग कल्याण  यांच्या पथकाने मंगळवारी रात्री धडक कारवाई केली आहे.
या कारवाईत अवैधरित्या दारू बाळगणाऱ्या, विक्री करणाऱ्या कल्याण शहर तसेच ग्रामीण परिसरातील २ धाबे, २ चायनीज दुकाने, तसेच कल्याण शहर भागात औवध रित्या दारु वाहतूक करणाऱ्या १ दुचाकी वाहनास, १ औवध हुक्का पार्रल वर कारवाईचा बडगा उचलीत अवैध दारू वाहतुक प्रकरणी दुचाकी जप्त करीत एकाला अटक केली आहे.   
दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अधिक्षक एन जी घुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारवाई चा बडगा उचला आहे. कल्याण विभाग निरिक्षक नंदकिशोर मोरे, दुय्यम निरिक्षक सुजीत कापाते,  स्नेहल केदारे आणि कर्मचारी यांच्या पथकाने हि कारवाई केली असून हि धडक कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे  कल्याण विभाग निरीक्षक नंदकिशोर मोरे यांनी सांगितले.    

 323 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.