वंदे भारत उपक्रमात चिनी कंपन्यांना सहभागी न करण्याच्या भारतीय रेल्वेच्या निर्णयाचे कॅटने केले स्वागत

मोठ्या उपक्रमात चिनी कंपन्यांना सहभागी करुन न घेण्याची कॅटची मागणी

मुंबई : वंदे भारत उपक्रमात सीआरआरसी पायोनियर इलेक्ट्रिक इंडिया या बीजिंग येथील चिनी सीआरआरसी-योगंजी इलेक्ट्रिक लिमिटेड आणि हरियाणातील मे फिल मॅड लिमिटेडच्या संयुक्त कंपनीस सहभागी करुन न घेण्याच्या भारतीय रेल्वेच्या निर्णयाचे कॉंफेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सने (कॅट) स्वागत केले आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय स्थानिक भारतीय कंपन्यांना स्वतःची क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण पाऊल असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला पाठबळ देणारा असल्याचे कॅटच्या प्रवक्त्याने सांगितले.
चिनी सैनिकांनी १० जुलै रोजी गुलवान घाटीत केलेल्या घुसखोरीनंतर कॅटने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून वंदे भारत उपक्रमात कुठल्याही चिनी किंवा त्यांच्याशी करार केलेल्या भारतीय कंपन्यांना सहभागी करुन न घेण्याची मागणी केली होती. कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकल पर व्होकल आणि आत्मनिर्भर भारत अभियानाला बळकटी देताना चिनी कपन्यांशी करारबद्ध असलेल्या कपन्यांना मनाई करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आनंद झाला. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे कुठल्याही वस्तूचे किंवा सामानाचे उत्पादन भारत करु शकतो असा संदेश जगाला गेला आहे. आता सरकारने फाईव्ह जी संचार नेटवर्क रोलआऊटमध्ये चीनच्या हुआवेई आणि जेडटीई कॉर्पोरेशनला प्रतिबंध करावा.
शासनाच्या कुठल्याही योजनेत किंवा उपक्रमात चिनी वस्तूंवर बंदी आणू शकतो याची जाणीव सरकारने करुन दिली आहे. अशाच पद्धतीने रेल्वे, परिवहन, महामार्ग, पूल, महत्वाचे उपक्रमांमध्ये सरकारने निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा सुरेशभाई ठक्कर यांनी व्यक्त केली.
चीनमध्ये तयार झालेली विविध उत्पादने, यंत्राचा वापर अनेक महत्त्वाच्या उपक्रमात केला जातो. या उपक्रमात सहभागी झालेल्या भारतीय कंपन्या इंटरनेट जोडणी असलेल्या चिनी मशिनरी वापरत आहेत. अशा मशिनरिंच्यामार्फत संबंधित उत्पादन, त्याची अंतर्गत माहिती चीनला मिळू शकते. याच मशिन्स, यंत्रे संवेदनशील भागात उपयोगात आणल्यास त्यांच्यामाध्यमातून चीनमधील कंपन्यांच्या सर्व्हरपर्यंत माहीती सहजपणे पाठवता येईल. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोकादायक ठरु शकणाऱ्या चिनी बनावटीच्या सर्व यंत्र, मशिन्सचा वापर करण्यास मनाई करायला पाहिजे असे स्पष्ट मत सुरेशभाई ठक्कर यांनी व्यक्त केले.

 560 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.