“अ” प्रभागक्षेत्रातील अनाधिकृत बांधकामांवर मनपाचा हातोडा

अनाधिकृत बांधकामे केली भुईसपाट, ५२ बेवारस, भंगार दुचाकी केल्या जमा

कल्याण : “अ” प्रभाग क्षेत्रातील अटाळी,  टिटवाळा परिसरातील अनाधिकृत रूम, अनाधिकृत दुकानाचे गाळे, अनाधिकृत हातगाड्या,  अनाधिकृत पत्र्याचे शेडवर “अ” प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने धडक कारवाईचा बडगा उचलित हातोडा चालवित भुईसपाट केली.
अ प्रभागातील टिटवाळ्यातील मोर्या नगर, गोवेली रोड परिसरातील २ अनाधिकृत रूम,  तसेच ४ अनाधिकृत दुकाने,  टिटवाळा येथील चिंतामण नगर २ अनाधिकृत रुम, २ अनाधिकृत गाळे, टिटवाळा महागणपती हँस्पीटल परिसर येथील अनाधिकृत पत्र्याचे शेड, रिजेन्सी रोड परिसरात ६ अनाधिकृत हातगाड्या निष्कसित करण्यात आल्या.  अटाळी येथील अनाधिकृत मोबाईल टाँवरचे सुरू असलेले काम बंद केले.  संदर्भीत बांधकामावर प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने कारवाईचा बडगा उचलित अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. तर टिटवाळा मंदिर रोड रस्त्यालगत बेवारस, भंगार उभ्या केलेल्या ५२ दुचाकी जमा करीत फुटपाथ नागरिकांच्या येण्या जाण्यासाठी मोकळे करण्यात आले.
या कारवाईसाठी १ जे.सी.बी., अनाधिकृत बांधकाम विभागचे २ पोलीस कर्मचारी तसेच  अनधिकृत बांधकाम पथकाचे १० कर्मचारी, असा फौज फाटा होता.  आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उप आयुक्त सुधाकर जगताप यांच्या निर्देशानुसार कारवाईचा बडगा सुरु राहणार असुन अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यावर एमआरटीपी अँक्टनुसार गुन्हे दाखल करीत कारवाई सुरू असणार असल्याचे प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांनी सांगितले.

 414 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.