मतदार संघातील अनेक प्रलंबित प्रकल्प, विकास कामे व राज्यातील विविध विषयांबाबत केली चर्चा
शहापूर : भिवंडी लोकसभा मतदार संघातील भाजपाचे खासदार व प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली,या भेटीत मतदार संघातील अनेक प्रलंबित प्रकल्प, विकास कामे व राज्यातील विविध विषयांबाबत उभयतांमध्ये राजभवनात सुमारे तासभर चर्चा झाली. या वेळी त्यांच्या सोबत भिवंडी तालुका भाजपा सरचिटणीस राम माळी उपस्थित होते.
493 total views, 1 views today