पाणी बिल थकबाकीदारांवर महापालिकेची धडक कारवाई

१३१३ नळ जोडण्या केल्या खंडीत

ठाणे : मालमत्ता कर आणि पाणी पुरवठा कराची वसुली करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर महापालिकेच्यावतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून पाणीबिलाची देयके न भरणाऱ्या तसेच मागील थकबाकीदारांवर धडक कारवाई करून १३१३ नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्यावतीने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर आणि पाणी देयकांची तसेच मागील थकबाकी वसुलीकरिता विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत नळ संयोजन खंडीत करुन, पाणीपुरवठा बंद करणे, जप्तीची कारवाई करणे, पंप रुम सिल करणे, पंप जप्तीची कारवाई करणे तसेच मोठ्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे अशा प्रकारची मोहिम हाती घेण्यांत आलेली आहे. या मोहिमेंतर्गत २१ डिसेंबररोजी १०७ नळ जोडण्या खंडीत करुन पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून आजपर्यँत एकूण १३१३ नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत.
तरी नागरिकांनी त्यांची पाणी बिलांची देयके तातडीने भरून महापालिकेस सहकार्य करावे व आपल्यावर होणारी कारवाई टाळावी असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 450 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.