राष्ट्रवादी काँग्रेसने १०८ सफाई कामगारांना केले सन्मानित

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त केला सन्मान

ठाणे : शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघातील वर्तकनगर, जयभवानी खेवरा सर्कल, गांधीनगर आरोग्य केंद्र येथील सुमारे १०८ सफाई कामगारांना कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘८ दशके कृतज्ञतेची’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या काळात ठाणे स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामगारांचा ‘कोविड योद्धा’ या पुरस्कारने सन्मान करण्यात येत आहे. आज याच उपक्रमाचा भाग म्हणून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडसाहेब यांच्या आदेशाने शहराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पूर्व भागात स्वच्छतेचे काम करणार्या वर्तकनगर सफाई पेटी येथील ४८, जयभवानी खेवरा सर्कल येथील ३०, गांधी नगर आरोग्य केंद्र येथील ३० अशा १०८ सफाई कामगारांना ‘कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहर अध्यक्षा सुजाता घाग, ठाणे शहर सचिव रचना वैद्य, ठाणे शहर सरचिटणीस रवींद्र पालव, मधूर राव, मा. नगरसेविका छाया राव, ठाणे शहर युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विधानसभा महिलाध्यक्षा शशिकला पुजारी, युवक विधानसभाध्यक्ष श्रीकांत भोईर, युवक विधानसभा कार्याध्यक्ष अनिकेत आर्यमाने,वागळे ब्लॉक अध्यक्ष विशाल खामकर, युवक ब्लॉक अध्यक्ष संदीप येताळ, महिला ब्लॉक अध्यक्षा ज्योती चव्हाण, अक्का नाडर, सिंधुताई सपाळ, वार्ड अध्यक्ष सुभाष आग्रे,गौतम मोरे, सतीश साळुंखे, विजय उबाळे, ठाणे शहर हॉकर्स सेलचे सरचिटणीस सुमीत खरे, ठाणे शहर युवक सरचिटणीस सौरभ वर्तक, मनिष सिंग, ब्लॉक कार्याध्यक्ष तुषार साळुंखे, युवक वॉर्ड अध्यक्ष मोहसीन मुल्ला, साहेब राजभर, सचिन शेवाळे, कौशिक कापसे, भावेश वाघ, देवेंद्र हातनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 524 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.