अनधिकृत बांधकामा विरोधात काॅग्रेसचे दिवा प्रभाग समिती कार्यालयासमोर आंदोलन

      

मनसेचे पदाधिकारीही झाले होते सहभागी

ठाणे : कोरोना कालावधीत सर्वत्र लाॅकडाउन असताना दिवा,मुब्रा,कळवा,ठाणे परिसरात अनधिकृत बांधकामे झालीच कशी?असा सवाल करित ठाणे शहर काँग्रेसच्या पदाधिका-यांनी जिल्हाध्यक्ष अॅड विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकैच्या दिवा प्रभाग समिती कार्यालयासमोर निदर्शने केली.या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही पदाधिकारी सहभागी झाले होते.
           अनधिकृत बांधकाम व फेरिवाला यांच्याकडून दरमहा ३ कोटीचा हप्ता एका अधिकारी-याला जातो असा आरोप काल पत्रकार परिषदेत ठाणे काँग्रेस अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांनी केला होता व याची सी.आय.डी चौकशीची मागणी देखील त्यांनी केली होती.
         आज याच धर्तीवर काँग्रेस कार्यकर्त्यानी ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समिती कार्यालयासमोर आंदोलन करून निदर्शने केली व सर्व अनधिकृत बांधकामे त्वरित हटविण्यात यावी अशी मागणी केली.
काॅग्रेस अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की,अधिकारी व स्थानिक राजकारणी याच्या संगमतानेच दिवा परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे कोविड सारख्या परिस्थितीचा फायदा घेऊन करण्यात आला असल्याचा आरोप केला.महिन्याला ६० हजार पगार घेणारा महापलिकेचा कर्मचारी कोट्यावधी  रुपयाची माया कशी जमवू शकतो?असे अनधिकृत बांधकाम,फेरीवाला अशा विविध मार्गाने हि माया जमविली जात असल्याने त्यांनी याप्रसंगी सांगितले या मार्गाने ठाणे महानगरपालिकेचा एक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच जागी नियुक्त असून याच अधिका-याकडे जवळ जवळ ३ कोटीचा हप्त्या दरमहा पोचविला जात असल्याचा त्यांनी पुन्हा आरोप केला.
याप्रसंगी ठाणे जिल्हा काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन शिंदे,मुंब्रा प्रभाग समिती सभापती दिपाली मोतीराम भगत,काँग्रेसचे माजी अध्यक्ष अनिल साळवी,नगरसेवक शानू पठाण,अनिल भगत,पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष सतोष भोईर,मनसे विभाग प्रमुख संतोष पाटील,मनसे उपविभाग प्रमुख शरद पाटील,समाजसेवक बाबुराव मुंडे शहर काँग्रेस उपाध्यक्ष भोलेनाथ पाटील,नाना कदम,वैशाली भोसले,अनघा कोकणे,रविंद्र कोळी,रेखा मिरजकर,मयूर भगत,राजू शेट्टी,वसीम खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.आंदोलकांची ठाणे महानगरपालिकेचे सहा.आयुक्त यांनी भेट घेउन आवश्यक ती कारवाई केली असल्याचे पत्र दिले व उपोषण मागे घेण्याची आंदोलकांना विनंती केली.

 171 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *