ठाणे तहसीलदारांची वाळू माफियांवर धडक कारवाई

कारवाई दरम्यान १५ अनाधिकृत रेतीचे प्लॉट कुंड्या जेसीबीच्या साह्याने खाडीतच नष्ट करण्यात आल्या.

ठाणे : उपविभागीय अधिकारी ठाणे विभाग ठाणे तहसीलदार रेतीगट व तहसीलदार ठाणे यांच्या संयुक्त पथकामार्फत दिवा शीळ रोड वरील खार्डी येथील खाडीमध्ये व बंदरावर वाळू चोरी प्रकरणी कडक कारवाई करून एकूण १५ अनाधिकृत रेतीचे प्लॉट कुंड्या जेसीबीच्या साह्याने खाडीतच नष्ट करण्यात आल्या. सदर कुंड्यांमध्ये अंदाजे ७० ते ७५ ब्रास इतका रेती साठा होता.एकूण १ कोटी १२ लाखाच्या मूद्देमालावर कारवाई करण्यात आल्याची माहिती ठाणे तहसीलदार युवराज बांगर यांनी दिली
या कारवाईत ५ सक्शन पंप व व ४ मोठ्या बोटी या समुद्र ओहोटी च्या वेळी खाडीतून बाहेर काढता येणे शक्य होत नसल्याने त्या पाण्यातच बुडवण्यात आल्या.या कार्यवाही मध्ये ७५ ब्रास रेती साठ्याची किंमत बाजार भावाप्रमाणे प्रति ब्रास ९९०० प्रमाणे एकूण ७,४२,५०० इतकी किंमत तसेच ५ सक्शन पंप प्रत्येकी पाच लाख प्रमाणे एकूण २५ लाख व ४ मोठ्या बोटी,बार्जेस प्रत्येकी २० लाख प्रमाणे ८० लाख असा एकूण १ कोटी १२ लाख रकमेचा मुद्देमाल खाडी मधील पाण्यातच नष्ट करण्यात आला.

 1,307 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.