या शिबिराकरिता शासकीय जिल्हा रूग्णालय, ठा.म.पा.कळवा रूग्णालय व लायन्स क्लब कोपरी यांची मदत घेण्यात आली आहे.
ठाणे : राज्यात कमी झालेल्या रक्तसाठा च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आदरणीय सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्या असून १७ ते २५ डिसेंबर पर्यंत ठाण्यातील विविध भागात ठाणे शहर जि काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली “रक्तदान पंधरवडा” शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शहर काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन शिंदे यांनी दिली.
१७ डिसेंबरला मुंब्रा व ठाणे स्टेशनवर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून या रक्तदान पधरवड्याला सुरूवात करण्यात येणार आहे.१८ डिसेंबरला शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालय येथे तर १९ डिसेंबरला ठाणे पुर्व येथील नारायणराव कोळी चौक येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. २० डिसेंबर ला वर्तकनगर काँग्रेस कार्यालय तर मुंब्रा रेती बंदर या दोन ठीकाणी रक्तदान शिबिरात रक्त संकलित करण्यात येणार आहे तर रविवार २२ डिसेंबर रोजी चितळसर मानपाडा येथे व सावरकर नगर काँग्रेस कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. २५ डिसेंबर रोजी कळवा नाका येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सचिन शिंदे यांनी दिली असून या शिबिराकरिता शासकीय जिल्हा रूग्णालय,ठा.म.पा.कळवा रूग्णालय व लायन्स क्लब कोपरी यांची मदत घेण्यात आली असून या शिबिरांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रक्त संकलित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
701 total views, 3 views today