भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांच्या उपस्थिती ५० पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी जाहीर
ठाणे : आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचा महिला मोर्चा देखील महत्वाची भूमिका बाजवणार असून यासाठी भाजप महिला मोर्चाच्या तब्बल ५० महिला पदाधिकाऱ्यांच्या अंगावर निवडणुकीची धुरा सोपवण्यात आली आहे. ठाण्यात नुकत्याच झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे तसेच आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्षा मृणाल पेंडसे यांच्या उपस्थिती यामहिला पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीसाठी कशा प्रकारे रणनीती असणार आहे याचा आढावा घेण्याबरोबर या सर्व महिला पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या दृष्टीकोनातून जबाबदाऱ्या देखील देण्यात आल्या आहेत.
ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्ष पदी ठाणे महापालिकेच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांची निवड झाल्यानंतर भाजपच्या सर्वच महिला कामाला लागल्या आहेत .आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महिलांचा देखील सक्रिय सहभाग असावा यासाठी त्यांनी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात करण्यात केली असून यासाठी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.ठाण्यात नुकत्याच झालेल्या जाहीर कार्यक्रमात महिला कार्यकारणीच्या ५० महिलांना पदे देण्यात आली आहे. या सर्व ५० महिला पदाधिकारी बूथ स्तरावर जाऊन पक्षाचे काम करणार असून सर्व मतदारांपर्यंत पोचणार आहे.
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी सर्व महिला कार्यकारणीचे अभिनंदन करून आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग स्तरावर आणि बूथस्तरावर या महिला पदाधिकारी काम करतील असे त्यांनी सांगितले. हे सरकार महिलांच्या बाबतीत संवेदनशील नसल्याने या सरकारच्या विरोधात आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येणार असून यासाठी डॉक्टर्स, पत्रकार, वकील आणि इतर क्षेत्रातील महिलांचा सहभाग असलेला रणरागिणीचा ग्रुप देखील तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याबरोबरच आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतरवून एक ऐतिहासिक कामगिरी करू असा विश्वास ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केला. तर आमदार निरंजन डावखरे यांनी आगामी काळात या महिला कार्यकारणीच्या माध्यमातून ठाणे शहरातून महिला शक्ती अनुभवयाला मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या सर्व महिलांना आमचे पाठबळ असेलच आणि आगामी निवडणुकीमध्ये त्या नक्कीच महत्वाची भूमिका बजावतील असे त्यांनी सांगितले.
जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारणीत उपाध्यक्ष पदी मनिषा सिंग ,रंजना मेनगुदले, राधा शर्मा , जयश्री सोळंकी,डाॅ .अपर्णा झोडगे, पौर्णिमा शेट्टी ,वीणा लाड, प्राची नाईक, सरचिटणीस पदी स्नेहा शिंदे.,माधुरी मेटांगे,निता पाटील,तृप्ती पाटील, चिटणीस पदी वर्षा सुर्वे , सोनाली मोरे , शिल्पा जित्ता ,दिपाली तळेकर,हर्षदा रेवाळे,नताशा सोनकर ,सुनिता जाधव, माधुरी पाटकर,कांचन पाटील , प्रिती खानेकर , प्रतिक्षा सावंत , संहिता देव, राधिका ताठे , कोषाध्यक्ष पदी पूजा गंद्रे तर कार्यकारणी सदस्य पदासाठी शिवानी गोखले , वैशाली मालुसरे , सिमा सावंत , कर्तिकी गाडे, सपना अच्छा , सविता सुतार , लता मोरे ,रेखा शिंदे , प्रिती भाडसावळे, संगिता ढवळे , सरिता सिंग , रेश्मा पाटील , रंजना दाभाडे , प्रतिभा पांडे , अनिता धारिवाल , स्मिता लव्हाटे , सायली कदम , डाॅ. संगिता पाटील , शुभांगी कदम , ज्योती लव्हे , शितल हिवारकर , अल्का पवार , मोनिका पाहुजा , सोनु सिंग , शिल्पा पाटील , प्रित तुली , वैशाली कडवं , उज्वला भोईटे वैशाली राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
456 total views, 3 views today