बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच सरनाईकांचा कडेलोट केला असता

आमदार प्रताप सरनाईकांनी आमदारकीचा राजीनामा देऊन माफी मागावी माजी आमदार , भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांची मागणी

कल्याण : बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच सरनाईकांचा कडेलोट केला असता अशी घणाघाती टीका भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यानी केली आहे. छत्रपती शिवाजी महराजांसाठी प्राण पणाला लावून झुंजणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्यासोबत तुलना करत तानाजी मालुसरे यांची बदनामी करणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी देखील पवार यांनी केली आहे.
नरवीर तानाजी मालुसरे हे योद्धे होते, निधड्या छातीने स्वराजाच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढले, त्यांचे बलिदान हे या मातीला प्रेरणा देणारे आहे. मात्र आमदार प्रताप सरनाईक यांनी आपली तुलना नरवीर तानाजी मालुसरे यांच्यासोबत करतानाच त्यांचा  अपमान केला आहे. बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिकही असे नव्हते, बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच सरनाईकांचा कडेलोट केला असता. तानाजी मालुसरे व्हायला धमन्यांमध्ये हिंदवी स्वराज्य रक्षणाचे रक्त सळसळले पाहिजे,  पाकिस्तानी क्रेडिट कार्ड बाळगणाऱ्यांनी तानाजी मालुसरे यांच्याशी तुलना करू नये. ते शूरवीर योद्धे होते त्यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही असेही भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले.

 490 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.