शासकीय कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट यांवरील बंदीच्या निर्णयाचे होतेय स्वागत

महाराष्ट्रातील सर्वच मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करावी ! – हिंदु जनजागृती समिती

मुंबई : महाराष्ट्र शासनाने नुकतीच राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. त्यानुसार यापुढे अधिकारी आणि कर्मचारी यांना जीन्स पँट, टी-शर्ट, भडक रंगाचे वा नक्षीकाम असलेले वस्त्र, तसेच स्लीपर वापरता येणार नाही. केवळ शोभनीय वस्त्र घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत आणि अभिनंदन करतो. काही दिवसांपूर्वी शिर्डी येथील साईबाबा संस्थानने भारतीय संस्कृती अनुरूप आणि सभ्यतापूर्ण कपडे परिधान करण्याचे अनुसरणीय आवाहन केले होते. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप आणि सभ्यतापूर्ण कपडे परिधान करण्याची वस्त्रसंहिता लागू करावी, अशी आम्ही मागणी करत आहोत.
या विषयी समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवून मागणी करण्यात आली आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की, भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू केल्यामुळे मंदिरातील पावित्र्य आणि श्रद्धाभाव टिकून राहण्यास साहाय्य होईल. भारतीय वस्त्र पाश्‍चत्त्यांच्या तुलनेत अधिक सात्त्विक आणि सभ्यतापूर्ण आहेत. तसेच भारतीय वस्त्र घातल्याने आपल्या संस्कृतीचा प्रचार-प्रचार होण्यासह तिच्याविषयी युवा पिढीमध्ये सार्थ स्वाभिमानही जागृत होईल. तसेच पारंपारिक वस्त्र निर्मिती करणार्‍या उद्योगाला चालना मिळेल. यासाठी राज्यशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

 395 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.