अ‍ॅड. गोविंद शर्मा भारतीय खो-खो महासंघाच्या कार्यकारी मंडळ सदस्यपदी

संघटनात्मकदृष्टीने पाठबळ मिळण्यासाठी अ‍ॅड. शर्मा यांची महासंघाच्या सदस्यपदी निवड उपयुक्त ठरणार आहे.

मुंबई : भारतीय खो-खो महासंघाची निवड प्रक्रिया शुक्रवारी (ता. ११) दिल्ली येथे पार पडली. या निवड प्रक्रियेत महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा यांची भारतीय खो-खो महासंघाच्या कार्यकारी मंडळ सदस्यपदी बिनविरोध निवड झाली.  
खो-खो मध्ये महाराष्ट्राने देशभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशपातळीवर महाराष्ट्राच्या अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. संघटनात्मकदृष्टीने पाठबळ मिळण्यासाठी अ‍ॅड. शर्मा यांची महासंघाच्या सदस्यपदी निवड उपयुक्त ठरणार आहे. शर्मा यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्राचे आधारस्तंभ उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, उपाध्यक्ष मंत्री जितेंद्र आव्हाड, महेश गादेकर, अशोक पितळे, विजय मोरे, वैशाली वेद्क लोंढे, ग्रीष्मा पाटील महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, राज्याचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोल, खजिनदार अ‍ॅड. अरुण देशमुख, संदिप तावडे यांच्यासह सर्व खो-खो परिवारातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या सचिव पदाची जबाबदारी अ‍ॅड. शर्मा यांनी सर्वांच्या सहकार्याने योग्य पध्दतीने पार पाडली आहे. भारतीय फेडरशेनच्या सदस्यपदाचा उपयोग निश्‍चितच संघटनेसाठी लाभदायक ठरणार आहे.

 363 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.