दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई

१० रूमचे अनाधिकृत बांधकाम आज जेसीबीच्या साहाय्याने संपूर्णपणे तोडण्यात आले.

ठाणे : दिवा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत बांधकामांवर आज महापालिकेच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण बांधकाम निष्कासित करण्यात आले.
दिवा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनानुसार दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी ही कारवाई केली. दिवा समितीमधील दोस्ती रेंटलच्या मागे अझीमखान व परवेज खान यांच्या १० रूमचे अनाधिकृत बांधकाम आज जेसीबीच्या साहाय्याने संपूर्णपणे तोडण्यात आले.

 316 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.