अब की बार,पेट्रोल ९० पार…वा रे वा मोदी सरकार…चा घुमला ठाण्यात नारा


ठाण्यात काँग्रेसची सर्वच पेट्रोलपंपवर निदर्शने

ठाणे : दिवसे दिवस वाढत्या पेट्रोल व डीझेलच्या वाढत्या कीमतीच्या निषेधार्थ काँग्रेसचे वतीने ठाण्यातील विविध पेट्रोल पंप समोर निदर्शने करण्यात आली व पेट्रोल भरण्यासाठी येणार्या ग्राहकांना या वाढत्या किमती करिता मिठाई वाटप करित केंद्र सरकारमधील भा.ज.पा.सरकारच्या निषेधार्थ उपहासात्मक आंदोलन केले.
  पेट्रोल व डीझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत रोज कमी अधिक प्रमाणात या दरात वृध्दी होत चालली असून आज काँग्रेसच्या पदाधिका-यांनी जिल्हाध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील तीन पेट्रोल पंप येथे सेवादल काँग्रेस अध्यक्ष शेखर पाटील,जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे,प्रदेश काँग्रेस सदस्य राजेश जाधव,सुखदेव घोलप,रविंद्र आंग्रे,गिरीश कोळी,ब्लाॅक अध्यक्ष नरेंद्र कदम व निलेश आहिरे,संजय यादव,मंजूर खत्रि,स्वप्नील कोळी,मिलिंद कोळी,  यांच्या उपस्थितीत तर तीन हाथ नाका येथील पेट्रोल पंप येथे प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे याच्या नेतृत्वाखाली विनय विचारे,राजू हैबती,माजी नगरसेवक शैलेश शिंदे,हिन्दुराव गळवे,रजनी पांडे यांच्या उपस्थितीत निदर्शने केली तर बाबूभाई पेट्रोल पंप येथे ब्लाॅक अध्यक्ष संदिप शिंदे,प्रकाश मांडवकर,धर्मवीर मेहरोल,निशिकांत कोळी,प्रसाद पाटील,शिरीष घरत, अक्रम बन्नेखान,बाळा घाग,सुजित पाटील  यांच्या नेतृत्वाखाली तर कासार वडवली येथील पेट्रोल पंप येथे रमेश इंदिसे,महेश पाटील,श्रीकांत गाडीलकर,आशिष गिरी,विनित तिवारी,राकेश यादव,अॅड दरम्यान बिस्ट,शितल आहेर,उमेश सिंग यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.मानपाडा,कापुरबावडी येथील पेट्रोल पंप वर पण निदर्शने करण्यात आली.
“अब की बार पेट्रोल ९० पार,वा रे वा मोदी सरकार”” पेट्रोलची दरवाढ रद्द करा”आदी घोषना याप्रसंगी कार्यकर्ते देत होते.ठाण्यातील घोडबदर रोड,कळवा,मुम्ब्रा येथील प्रत्येक पेट्रोल पंपवर काँग्रेस पदाधिकारी एकत्र येउन निदर्शने करत आपला रोष व्यक्त करित होते.
या प्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की केंद्रातील भा.ज.पा.सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून संपूर्ण देशाला फसविले आहे यापूर्वी हेच भा.ज.पा.वाले ५ रूपये दरवाढ झाली की रस्त्यावर उतरून आंदोलन करित असत आता यांच्या कारकीर्दीत पेट्रोल ची तिप्पट दरवाढ  झालीय आता भा.ज.पा.वाले गप्प का?असा प्रश्न विचारून ज्या लोकांनी भा.ज.पा.वर विश्वास दाखवत समर्थन करत होते त्यांची कशी फसवणूक झाली हे लक्षात राहावे म्हणून आम्ही त्यांना मिठाई वाटली व केंद्र सरकारने केलेल्या वायद्याची आठवन करून दिली.असे बोलताना त्यांनी सांगितले.

 355 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.