शहापूरात डी वाय फाउंडेशनचा झंझावात

दयानंद चोरघे यांनी भाजपाच्या प्रदेश सचिव पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी डी वाय फाउंडेशनच्या शाखा उघडण्यास सुरुवात केली आहे.

शहापूर : सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेल्या दयानंद चोरघे संचलित डी वाय फाउंडेशनच्या नवीन शाखांची उद्घाटने सध्या शहापुरात होत असून महिनाभरापासून हा झंझावात कायम राहणार असल्याचे चोरघे यांनी सांगितले. भाजपातून काडीमोड घेऊन काँग्रेसवासी झालेले दयानंद चोरघे यांची हि रणनीती भविष्यात भाजपाला महागात पडेल अशी चर्चा होत आहे
शहापूर तालुक्यात सध्या डी वाय फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष जयकुमार करण यांच्या नेतृत्वाखाली शाखांची उदघाटने होत आहेत.
शहापूर तालुक्यात नुकताच विहिगाव,कांबारे, किन्हवली या ठिकाणी
डी वाय फाउंडेशनच्या शाखांची उदघाटने झाली. या वेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद मोतीराम‌ चोरघे हे आवर्जून उपस्थित होते.
यावेळी डि.वाय.फाऊंडेशनचे शहापुर तालुका अध्यक्ष जयकुमार करण,गणेश विशे,किशोर विशे अविनाश विशे,केशव विशे आणि डि.वाय शाखेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
दयानंद चोरघे यांनी भाजपाच्या प्रदेश सचिव पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी डी वाय फाउंडेशनच्या शाखा उघडण्यास सुरुवात केली आहे.त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यास सुरुवात केली असून युवावर्गही मोठ्याप्रमाणात आकर्षित केला आहे.त्यामुळे भाजपालाही त्याचा मोठा फटका बसणार अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे

 290 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.