रिक्षा टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात संघटनेच्या पाठपुराव्याला यश

परिवहन विभागाने मंञालयात बोलावली सयुंक्तिक बैठक

कल्याण : रिक्षा टॅक्सी चालकांचे अनेक वर्ष शासन दरबारी रिक्षा टॅक्सी चालकांचे खुले रिक्षा परवाने बंद करणे, कल्याणकारी महामंडळ अमलबजावणी, प्रलंबित भाडे दरवाढ व इतर मागण्या तात्काळ सोडविण्या संदर्भात मंञलयात परिवहन मंञी अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे व मुबंई एम.एम.आर.डी.ए. क्षेञातील रिक्षा टॅक्सी संघटना प्रतिनिधी यांची सयुंक्तिक बैठक शुक्रवारी बोलावली होती.
रिक्षा टॅक्सी संघटनाचां सात्तत्याने केलेला पाठपुरावा याची दखल घेऊन खुद्द परिवहन मंञी यांनी परिवहन विभागास संयुक्तिक बैठक आयोजनाचे निर्देश दिले होते. यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांच्या काही प्रमुख मागण्या लवकरच मान्य होतील असा विश्वास संघटनेच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे. बैठकित मुबंई प्रमुख रिक्षा टॅक्सी संघटनेचे नेते व कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी प्रलंबित मागण्या सोबतच दहा वर्ष जुनी रिक्षा परवान्यावर बदली करण्याची परवानगी द्यावी ही  मागणी केली.
या बैठकीस कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ अध्यक्ष प्रकाश पेणकर, एकनाथ पिगंळे, संतोष नवले, ऋषीकेश पाटील, रामदास करकरे, शेळके, अकुंश म्हाञे, उदय शेट्टी, गजानन पाटील, अर्जुन माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 271 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.