ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.भाऊसाहेब दांगडे

प्रशासकीय कार्यकाळात त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून १ ऑगस्ट २००२ रोजी पहिल्या महसूल दिनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून त्यांना गौरविण्यात आले.

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब  दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला. यापूर्वी ते रायगड येथे जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी कार्यरत होते.
प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ.भाऊसाहेब दांगडे हे भारतीय प्रशासन सेवेचे अधिकारी आहेत. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाचे रहिवासी  आहेत. त्यांनी मुंबई येथून बी.व्ही.एस. सी.अँड एच. ही पशुवैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त केली आहे.
त्यांनी यापूर्वी जळगाव आणि श्रीरामपूर प्रांत अधिकारी,  उप जिल्हाधिकारी ( रो.ह.यो) धुळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अहमदनगर, निवासी उप जिल्हाधिकारी अहमदनगर, जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक म्हणून सेवा बजावली आहे. २०११ साली त्यांना पदोन्नती मिळून ते अप्पर जिल्हाधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी कोकण गृह निर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडा येथे सेवा बजावली. त्यानंतर उपायुक्त ( महसूल) कोकण विभाग , आणि अध्यक्ष जात पडताळणी समिती म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. आता ते जिल्हा परिषद ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त झाले आहेत.
प्रशासकीय कार्यकाळात त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून १ ऑगस्ट २००२ रोजी पहिल्या महसूल दिनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून त्यांना गौरविण्यात आले.

 373 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.