पोलीस आयुक्तांशी साधला दूरध्वनीवरून संपर्क
ठाणे : समाजसेवक व मनसे कार्यकर्ते जमील शेख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करून खऱ्या सूत्रधारांना गजाआड करावे, अशी विनंती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.
शांत शहर असा लौकिक असलेल्या असलेल्या ठाण्यात काल दिवसाढवळ्या घडलेल्या हत्याकांडाची विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गंभीर दखल घेतली. ठाण्यातील कायदा व्यवस्थेबरोबरच शांतता कायम राहावी, यासाठी त्यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करण्याची विनंती केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून खऱ्या सुत्रधारांना गजाआड करावे. तसेच त्यातील कट उघड करावा, अशी विनंतीही दरेकर यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
460 total views, 3 views today