“युटर्न” मारणारे ऊर्जामंत्री अशी घोषणा देत, कोपरीत भाजपचे आंदोलन


लवकरात लवकर वीज बिल कमी नाही केले की तीव्र आंदोलन करणार असा इशारा यावेळी देण्यात आला.               

ठाणे : ठाण्यातील कोपरी येथे देखील वाढीव वीज बिला विरोधात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ऊर्जामंत्री नितीन राऊत हे यु-टर्न मारणारे मंत्री असल्याच्या घोषणा यावेळी कार्यकर्त्याकडून देण्यात आल्या. यावेळी महावितरण कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राज्य सरकार दुटप्पी भूमिका असून निर्दयी सरकारचा यावेळी निषेध करत महावितरणच्या व्यवस्थापकाना निवेदन देण्यात आले. दरम्यान लवकरात लवकर वीज बिल कमी नाही केले की तीव्र आंदोलन करणार असा इशारा यावेळी देण्यात आला.               
  लॉकडाऊन तसेच कोरोना काळात अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद झाले आहेत. त्यातच आवाच्या सव्वा वाढीव वीज बिल आल्याने अनेकांच्या  पायाखालची वाळू सरकली आहे. आलेली बिल आम्ही कसे भरणार अशी चिंता ग्राहकांना पडू लागल्याने नागरीक देखील संभ्रमात आहेत. या आंदोलनात शेकडो आंदोलनकर्त्यांनी सहभाग घेतला असून, येत्या काही दिवसांत वाढीव बिले कमी केली नाहीत तर जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

 344 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.