२८ लाखांचा अवैध दारु साठा जप्त

उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

कल्याण : दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली विभाग पथकाने धडक कारवाई करत कल्याण शीळ रोड वरील सोनारपाडा, उसरघर परिसरातुन २८ लाख ८० हजार रुपये ४०रू किंमतीचा अवैध दारु साठा जप्त केला असुन या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असुन एक मुख्य आरोपी फरार आहे.
शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास कल्याण शीळ रोडवरील आर्या लाँजच्या बाहेर तीन चाकी टेम्पो नं एम् एच् ०५ डी क्यु ७५०६ मधील मँक्यडाँल ब्रँन्डची  १८०एमएलच्या ३लाख ४५ हजार किंमतीच्या सुमारे १२०० बाटल्या दारू जप्त करण्यात आली. टेम्पो चालक दिपक तेजराव बोरडे वय २६वर्षे याला  दारूबंदी उत्पादन शुल्क पथकाने  ताब्यात  घेतले असता चौकशी अंती पावणे तीनच्या सुमारास मानपाडा जवळील उसरघर गाव परिसरातील वीट भट्टी येथे उभ्या असलेल्या एमएच ०४ बी यु ९४५४ ट्रकमधुन गोवा बनावटीच्या राँयल क्लँसिको १८० एमएलच्या  २८लाख ७८ हजार ४०रू किंमतीच्या सुमारे १६हजार ५६० बाटल्या, मँक्यडाँलचे लेबल असा दारू साठा जप्त करण्यात आला.
यातील आण्णा नामक मुख्य आरोपी फरार असुन त्यांचा शोध सुरू आहे. तर आरोपी दिपक यांस दोन दिवासांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे. विभागीय उपाआयुक्त सुनील चव्हाण, जिल्हा आधिक्षक नितिन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई दारूबंदी उत्पादन शुल्क निरिक्षक आनिल पवार, सब इनेस्पक्टर मल्हारी होळ, विश्वजीत अभाळे कर्मचारी पथकाने केली.

 368 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.