दिवाळीनिमित्त गरजूंना साहित्याचे वाटप

तिरंगा जागृती विचार मंच आणि टीम परिवर्तनचा उपक्रम

कल्याण : वंचित आणि दुर्लक्षित समाजघटकांना देखील दिवाळीचा आनंद घेता यावा यांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कल्याणच्या तिरंगा जागृती विचार मंच आणि टीम परिवर्तनच्या माध्यमाने उतनेवाडी, आडिवली, बेलकरपाडा, दहिवली येथे दिवाळीनिमित्त कपडे, फराळ आणि घरोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळीं चेतन म्हामुणकर, तुषार वारंग, स्वप्नील शिरसाठ, भुषण राजेशिर्के, मंगेश तिवारी, अविनाश पाटील, प्रणिल मिसळे, गीतेश कोटपकर, नरेंद्र शुक्ला,भक्ती कुंभार उपस्थित होते.
तिरंगा जागृती विचार मंचच्या माध्यमाने जमा झालेले कपडे यावेळीं गरजूंना वाटण्यात आले. त्याचबरोबर बेलकरपाडा येथील वीटभट्टीवर घरोपयोगी साहित्य देण्यात आले. सिध्दीविनायक ॲनेक्स सोसायटीने साहित्य देण्यासाठी मदत केली. त्याचबरोबर टीम परिवर्तनच्या मदतीने युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था दहिवली येथे गीता भास्कर यांच्या माध्यमाने मुलांना डिजिटल अभ्यासवर्ग सुरू करण्यासाठी एक नवीन कम्प्युटर देण्यात आला. याचं ठिकाणी जय फाउंडेशनच्या जय शृंगारपुरे यांनी दिलेल्या खेळण्याच्या मदतीने लहान मुलांसाठी टॉय बँक सुरू करण्यात आली.
दिवाळीचा सण आपल्या समाजातील दुर्लक्षित घटकांसोबत साजरा करण्यासाठी साहित्य संकलन मोहीमेत सहकार्य करणाऱ्या कल्याणकर नागरिकांचे चेतन म्हामुणकर यांनी यावेळीं आभार व्यक्त केले. साहित्य वाटप करण्यासाठी सोमनाथ राऊत यांचे यावेळीं विशेष सहकार्य मिळाले तसेच अजित कासार, प्रथमेश सुर्यवंशी, शुभम निकम, सुरज सुरोसे, अंगज, बिरा, जित यांनी मोहिमेचे नियोजन पाहिले.

 261 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.