यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात तालुक्यातील शहापूर, धसई, किन्हवली, सोगाव, चेरपोली, पवारपाडा अल्याणी,गुंडे, खराडे, आसनगाव, साने, सापगाव व अनेक गावात सदर पथकाच्या वतीने कारवाई करण्यात आली होती
शहापूर : आज ०७ नोव्हेंबर रोजी सकाळी भल्या पहाटे शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या नेतृत्वाखाली शहापुर तालुक्यातील सावरोली गावातील वीजग्राहकांची वीजपुरवठ्याची तपासणी करण्यात आली सदर मोहिमेत १९ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर सुरु असल्याचे आढळून आले असून महावितरणच्या भरारी पथकाने भल्यापहाटे सदर कारवाई केली त्यामध्ये सरासरी ३५००० युनिटची वीजचोरी पकडण्यात आली असून यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात तालुक्यातील शहापूर, धसई, किन्हवली, सोगाव, चेरपोली, पवारपाडा अल्याणी,गुंडे, खराडे, आसनगाव, साने, सापगाव व अनेक गावात सदर पथकाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये ५५ लाख रुपये वीजचोरांकडून वसूल करण्यात आले असून या नंतर देखील दैनंदिन अश्या मोहीमा चालू राहणार असल्याचे महावितरण कडून जाहीर करण्यात आले आहे
वीजचोरीकरणाऱ्या व्यक्तीस वीज कायदा-२००३ चे कलम १३५ व १२६ नुसार तीन वर्षांपर्यंतचा कारावास तसेच दंडाच्या शिक्षेची तरतूद असून वीज ग्राहकांनी महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा. तसेच सावरोली गावात सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची पाणी पंपाची चोरी उघडकीस आली आहे तरी सरपंच व ग्रामसेवक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. महावितरण तर्फे तालुक्यात गावांसाठी हाय मास व पाणी पंप डायरेक्ट केल्यास सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाईचा इशारा दिलेला आहे व त्यासाठी अधिकृत रीतसर जोडणी घेण्याचे आव्हाहन करण्यात आले आहे, तसेच येत्या काही दिवसात तालुक्यातील पोल्ट्री धारक, विटभट्टी धारक, गावाचा पाणी पुरवठा, हाय मास पथदिवे आपल्या रडार वर असल्याचे कटकवार यांनी सांगितले…
तरी सदर गावाचा पाणी पुरवठा, हाय मास पथदिवे यांची विजचोरी आढळल्यास सरपंच व ग्रामसेवक यांचेवर गुन्हे दाखल करण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
सदर मोहिमेत सहाय्यक अभियंता वाघ, कदम, खैतापूरकर, शहापूर विभागाचे मुख्य तंत्रज्ञ,वरिष्ठ तंत्रज्ञ,सुरक्षा रक्षक असे एकूण ३५ लाईनस्टाफ उपस्थित होते
556 total views, 1 views today