खरीवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सायली हरड

उपसरपंच मंदा दौलत हरड यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त होते.

शहापूर : खरीवली (सो) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सायली उर्फ ललिता साईनाथ हरड यांची आज बिनविरोध निवड झाली.
खरीवली(सो) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक आज सरपंच बाळू वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेचे कामकाज ग्रामसेविका मयुरी पाटील यांनी काम पाहिले.
उपसरपंच मंदा दौलत हरड यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त होते.त्यानुसार आज उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.
सायली हरड यांच्या उपसरपंच पदासाठी सचिन उबाळे यांनी सूचक तर मंदा दौलत हरड यांनी अनुमोदन दिले.यावेळी सभागृहात ग्रामपंचायत सरपंच बाळू वाघ, माजी उपसरपंच मंदा दौलत हरड,सदस्य रामचंद्र हिलम, सचिन उबाळे, रत्ना मुकणे, उषा मुकणे आदि सदस्य उपस्थित होते.
खरीवली ग्रामपंचायत उपसरपंच पदी सायली हरड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल शहापूर पंचायत समिती सदस्य व भाजपाचे गटनेते सुभाष हरड यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुकुंद हरड,दौलत हरड,साईनाथ हरड, नारायण हरड,महेश हरड, प्रतीक हरड आदि उपस्थित होते.

 604 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.