राज्यातील स्विमिंग पूल, चित्रपटगृह-नाट्यगृह उद्यापासून सुरु

राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

मुंबई : Missionbeginagain अंतर्गत राज्य सरकारने आणि अनलॉक लॉकडाऊन अंतर्गत राज्यातील जलतरण खेळाडू आणि मर्यादीत लोकांकरीता स्विमिंग पूल, चित्रपटगृह-नाट्यगृह-मल्टीप्लेक्स आणि योगा इन्स्टिट्युट सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. तसेच या तीन गोष्टी ५ नोव्हेंबर अर्थात उद्यापासून सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून त्या अनुषंगाने अधिसूचना जारी करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अनलॉकअंतर्गत अनेक गोष्टी खुल्या केल्या होत्या. मात्र राज्य सरकारने राज्यात त्या गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली नव्हती.
अखेर आज यासंदर्भात राज्य सरकारने आदेश जारी करत राज्यातील स्विमिंग पूल ( जलतरण तलाव), योगा प्रशिक्षण केंद्रे आणि चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टीप्लेक्स थिएटर सुरू करण्यास परवानगी दिली.
या गोष्टी सुरु करण्यास परवानगी
यापैकी चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टीप्लेक्स थिएटर्स सुरु करण्यास फक्त ५० टक्के क्षमतेची परवानगी देण्यात आली आहे. तर स्विमिंग पूल हे प्रामुख्याने जलतरण पटूंच्या दैंनदिन सरावासाठी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली.
तसेच इनडोअर स्पोर्टस अॅक्टीव्हीटीमधील बॅडमिटन, टेनिस, क्वॉश, इनडोअर शुटींग आदी खेळास ही परवानगी देण्यात आली आहे.
या सर्व गोष्टी सुरु करताना कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु करण्याच्या अनुषंगाने नियम व अटींचे पालन करावे लागणार आहे.

 445 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.