शाहिर स्वप्निल शिरसाठ यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधनपर कार्यक्रमांचे त्रिशतक

आदिवासीपाडे, शाळा, महाविद्यालयात,  गणेशोत्सवात, नवरात्रोत्सव तसेच लग्नसमारंभ, वाढदिवसाच्या, तेराव्याच्या ठिकाणी जाऊन स्वप्निल परिवर्तनाच बीज पेरत आहे.

कल्याण : शैलेंद्र महाविद्यालयात दहिसर येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर ऑनलाइन वेबिनार च्या माध्यमातून कल्याणचा शाहिर स्वप्निलचा वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधनपर कार्यक्रम ३०० वा प्रयोग नुकताच पार पडला.
श्रद्धा व उपासना स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिलं आहे परंतु त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन कुणी सर्वसामान्यांना लुबाडू नये ह्यासाठी शाहीर स्वप्निल शिरसाठ ठिकठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणीचे प्रबोधनपर कार्यक्रम घेत असतो. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार प्रसार करणे हे प्रत्येक भारतीयाचे काम आहे असे भारतीय संविधान सांगते आणि तेच काम मी भारतीय म्हणून करत आहे असे स्वप्निल ने सांगितले. आपल्या समाजाला शिवराय, फुले, शाहु, आंबेडकर दाभोळकरांच्या आचार विचारांची गरज आहे आणि त्यांचे विचार समाजात रुजावेत ह्यासाठी त्यांच्या कार्याबद्दल स्वप्निल स्वालिखित गीतांच्या माध्यमातून शाहिरी, कलेच्या माध्यमातून जनजागृती करत आहे.
स्वतः एम.एस.डब्ल्यू झालेला स्वप्निल हा एक उत्तम लेखक, कवी, आणि गायकही आहे व सामाजिक कार्याचा त्याचा गाढा अनुभव ही आहे. सध्या स्वप्निल एका सामाजिक संस्थेत काम करत आहे. स्वतःचा जॉब सांभाळून शक्य त्या परीने तो प्रबोधन करत आहे. आदिवासी पाडे, शाळा, महाविद्यालयात,  गणेशोत्सवात, नवरात्रोत्सव तसेच लग्न समारंभ, वाढदिवसाच्या, तेराव्याच्या ठिकाणी जाऊन स्वप्निल परिवर्तनाच बीज पेरत आहे.
शाहिरी कलेच्या जोरावर तो विविध सामाजिक विषयावर भाष्य करत असतो, माणुसकीचे धडे देत असतो. श्रध्दा अंधश्रद्धा, स्रिया आणि अंधश्रद्धा, मन मनाचे आजार, भुताची निर्मिती, हुंडा, बलात्कार, देशभक्ती, मानवता, संविधानाचे महत्त्वाचे अशा विविध विषयांवर स्वप्निल प्रबोधन करत असतो. तुम्ही किती कार्यक्रम सादर करतात ह्यापेक्षा तुम्ही तुमच्या सोबत किती लोकांना घडवतात हे मला अधिक महत्त्वाचे आहे. स्वप्निल ने युवकांचे संघटन उभे केले आहे. त्यांना चमत्कार आणि बोलण्याचे कसब, मांडणी ह्या प्रकारचे प्रशिक्षण स्वप्निल देत असतो आणि तेही आत्ता स्वतंत्रपणे प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यासाठी तयार झाले आहेत असे स्वप्निल ने सांगितले. 

 665 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.