भाजपा जिल्हा महिला उपाध्यक्षा सुचिता होळकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली मागणी
कल्याण : कोरोना पार्श्वभूमीवर सर्वसामान्यची आर्थिक घडी पुर्णत: विस्कटली आहे. आशा परिस्थितीत महिला बचत गटाच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी स्टाँल देण्याची मागणी भाजपा जिल्हा महिला उपाध्यक्षा सुचिता होळकर यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.
दिवाळी निमित्त महापालिका क्षेत्रातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे स्टॉल उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची भेट घेऊन भाजपा जिल्हा महिला उपाध्यक्षा सुचिता होळकर व भााजपा जिल्हा महिला सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी यांनी निवेदन दिले.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सुमारे ६५० एपीएल महिला बचत गट आहेत. तर सुमारे २०० बीपीएल महिला बचत गट आहेत. कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या आठ महिन्यात अनेकांच्या रोजगाराला झळ बसली असुन त्यामुळे अनेक महिलांना घर चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आशा प्रसंगात माहिला बचत गटांना स्टाँल उपलब्ध करून महिला बचतगटांना उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरूपात, दिवाळीनिमित्ताने हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून आधार देत महिला शासन धोरणाची अंमलबजावणी होणे बाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची भाजपा जिल्हा महिला उपाध्यक्षा सुचिता होळकर यांनी भेट घेत निवेदन दिले आहे. यामुळे मनपाक्षेत्रातील माहिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळणार असे दिलासादायक चित्र दिसत आहे.
दरम्यान मनपा क्षेत्रातील माहिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी दिवाळीनिमित्त स्टाँल उपलब्ध करणे बाबत सकारात्मक बाब म्हणुन प्रशासनास काही करता येईल का असे पाहणार आहे.
608 total views, 1 views today