आदिवासी विकास महामंडळातर्फे दिवाळी पूर्वी खरेदी सुरु होणार
शहापूर : शहापूर तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी अर्थीक संकटात सापडला असल्याचे निदर्शनास येत असून शेतकऱ्यांचा उरलासुरला भात खरेदी करून शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याच्या हेतुने आदिवासी विकास महामंडळातर्फे शहापुरात ६ ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी मंजूरी दिली असल्याचे शहापुरचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सदानंद राजुरे यांनी सांगितले असून खरेदीसाठी लागणाऱ्या सहित्याचे नियोजन सुरु असून दिवाळीपूर्वी टप्प्या-टप्प्याने भात खरेदी केंद्र सुरु करणार असल्याचे सांगितले.
तालुक्यातील भातसानगर,खर्डी, किन्हवली, आटगाव, वेहळोली व अघई या ६ ठिकाणी भात खरेदी केंद्राला आदिवासी विकास महामंडळाकडून मंजूरी मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाने सन २०२० -२१ सालाच्या खरीप हंगामासाठी भाताची आधारभूत किंमत साधारण दर्जाच्या भातासाठी १८६८ रुपये प्रति क्विंटल तर’अ’दर्जाच्या भातासाठी१८८८ रुपये प्रति क्विंटल जाहीर केली आहे.खरेदी केंद्र सुरु नसल्याने तालुक्यातील खाजगी व्यापारी भात खरेदी करण्यासाठी आगाउ रक्कम देण्यासाठी शेतकऱ्याकड़े सद्या चकरा मारत असुन,घरची गरज पूर्ण करण्यासाठी शेतकरी आपला भात ९०० ते १००० रुपये क्विंन्टल या कवडी मोलाने अनामत घेऊन विकत आहेत.शेतकऱ्यांकडून सातबारा,फेरफार व पासबुक झेरॉक्स घेऊन भात खरेदी होणार असून ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे.
591 total views, 1 views today