१ नोव्हेंबर रोजी उप राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम पूर्ण जिल्ह्यात राबवणार
ठाणे : ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत उप राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार १ नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. 0 ते 5 वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यासाठी जवळच्या बुथवर घेऊन जाण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील यांनी केले आहे. या मोहिमे अंतर्गत १ लाख ५ हजार ७६० लाभार्थाच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. या संदर्भात आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सुकाणू समितीची बैठक संपन्न झाली.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंगे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.अंजली चौधरी,सर्वेलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. जळगावकर तसेच मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी तालुक्याचे तालुकाआरोग्य अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेसाठी एकूण बुथ १ हजार ७५ उभारण्यात येणार असून यासाठी २ हजार ६२९ टीम तयार करण्यात आल्या आहेत. तसेच ५२६ टीम पर्यवेक्षक असणार आहेत. तर २१५ बूथ पर्यवेक्षक असणार आहेत. त्याचबरोबर १५७ मोबाईल टीम असणार आहेत. या संपूर्ण मोहिमेत ९ हजार ४१८ कर्मचारी काम करणार आहेत.
कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करून सदर मोहीम राबविण्यात येणार आहे व त्याबाबत सर्व आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण जिल्हा आरोग्य विभागामार्फत घेण्यात आले आहे
511 total views, 4 views today