देवेंद्र फडणवीस यांच्या आरोग्यासाठी ठाण्यात भाजपातर्फे होमहवन

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज महाराष्ट्राला नितांत गरज आहे. त्यांनी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. त्यांच्यामागे लोकभावना व लोकांचे आशिर्वाद असून, त्यांची प्रकृती लवकर सुधारावी, यासाठी आज होमहवन करण्यात आला, अशी माहिती आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिली.

ठाणे : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोग्यासाठी ठाणे शहर जिल्हा भाजपातर्फे आज होमहवन करण्यात आला. आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला भाजपाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह नागरिकांचीही उपस्थिती होती.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विविध भागांचा दौरा केला. तसेच कोरोना संदर्भात राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. तसेच आढावाही घेतला होता. त्यांच्या दौऱ्यामुळे कोरोना रुग्णांना विविध सुविधा मिळण्यास मदत झाली होती.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज महाराष्ट्राला नितांत गरज आहे. त्यांनी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. त्यांच्यामागे लोकभावना व लोकांचे आशिर्वाद असून, त्यांची प्रकृती लवकर सुधारावी, यासाठी आज होमहवन करण्यात आला, अशी माहिती आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिली.
टिकूजिनीवाडी येथील नवयूग मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवात आज झालेल्या होमहवनात निरंजन डावखरे यांच्याबरोबरच आमदार संजय केळकर, प्रदेश सचिव संदिप लेले, नगरसेविका स्नेहा आंब्रे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश आंब्रे आदींची उपस्थिती होती.

 427 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.