कोरोना रुग्णांना महापालिकेने दिले मेडिटेशन व समुपदेशनाचे धडे

या समुपदेशन कार्यक्रमामध्ये मधील सुमारे २०० पॉझिटिव्ह रुग्ण, महापालिकेचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, उप अभियंता प्रमोद मोरे, एमएमआरडीए रेंटल बिल्डिंग, क्वारंटाइन व कोविड केअर सेंटर येथील व्यवस्थापक डॉ. दिपाली मोरे व तेथे कार्यरत असलेले इतर सर्व डॉक्टर, कर्मचारी वर्ग आणि मैत्रेय संघाचे कायदेविषयक सल्लागार राहुल शेटे उपस्थित होते.

कल्याण : भिवंडी बायपास रोडवरील एमएमआरडीए रेंटल बिल्डिंग क्वारंटाइन व कोविड केअर सेन्टरमध्ये पॉझिटिव्ह परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांना ठेऊन त्यांच्यावर उपचार केले जातात. या कोविड केअर सेंटर मधील रुग्णांसाठी महापालिकेने मैत्रेय संघामार्फत मेडिटेशन व समुपदेशन सत्राचे आयोजन शुक्रवारी केले होते.
या सत्रांमध्ये मैत्रेय संघाचे सरसंघचालक बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित रुग्णांना मोलाचे मार्गदर्शन केले. श्वास हा आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा सगळ्यात जवळचा मित्र असतो, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही जोपर्यंत आपण आजारी पडत नाही. आपले श्वास हे दुःखात वेगळे असतात, आनंदात वेगळे असतात, मैत्री भावात वेगळे असतात, सकाळ -संध्याकाळ किमान १० मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असं सलग केल्यावर आपल्या मनात, बुध्दीत, वागण्यात, बोलण्यात एक वेगळी पॉझिटिव्हीटी येते व आपण सकारात्मक विचार करायला लागतो, आपली चिडचिड कमी होते, आणि आपला स्वत:च्या संगतीत देखील खुश रहायला लागतो,” असे बाळासाहेब थोरात यांनी रुग्णांना मार्गदर्शन करताना सांगितले.
या मेडिटेशन व समुपदेशन सत्रामुळे कोविड आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांमधील मनोबल व उत्साह वाढण्यास मदत होणार आहे. या समुपदेशन कार्यक्रमामध्ये मधील सुमारे २०० पॉझिटिव्ह रुग्ण, महापालिकेचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, उप अभियंता प्रमोद मोरे, एमएमआरडीए रेंटल बिल्डिंग, क्वारंटाइन व कोविड केअर सेंटर येथील व्यवस्थापक डॉ. दिपाली मोरे व तेथे कार्यरत असलेले इतर सर्व डॉक्टर, कर्मचारी वर्ग आणि मैत्रेय संघाचे कायदेविषयक सल्लागार राहुल शेटे उपस्थित होते.

36 total views, 1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *