देशातल्या सगळ्याच मिळणार असल्याची अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची माहिती
मुंबई : बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची लस मोफत देणार असल्याची घोषणा भाजपाने केली. त्यानंतर अनेक राज्यांनी मोफत लस देणार असल्याची घोषणा केली. त्याधर्तीवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही राज्यातील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असल्याचे सांगत देशातील प्रत्येकालाच मोफत लस देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
तसेच बिहार निवडणूकीत भाजपा हरली तरी मोफत द्यावीच लागणार आहे. परंतु जर एखाद्यावेळी केंद्राने मोफत लस दिली नाही तर महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातील सर्वांना मोफत लस देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम केला. त्यामुळेच देशात कोरोनाचा फैलाव झाला. तसेच देशात लॉकडाऊन लावण्याची पाळीही आली नसती असेही त्यांनी स्पष्ट केले.
506 total views, 1 views today