केडीएमसीच्या वक्तृत्व स्पर्धेत ओवी महाजन अव्वल

लहान मुलांनी दिलेले मंत्र सर्वांनी पाळावे – पालिका आयुक्त

कल्याण : लहान मुलांनी आज दिलेले तीन मंत्र म्हणजेच “मास्क लावणे, हात वारंवार धुणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे” हे सर्वांनीच पाळावेत, असे उदगार पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले. “माझे कुटूंब, माझी जबाबदारी” या मोहिमे अंतर्गत याच विषयावर महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजिलेल्या वक्तृत्व व अभिनय स्पर्धेच्या अंतिम फेरी प्रसंगी त्यांनी हे उदगार काढले. या वक्तृत्व स्पर्धेत ओवी महाजन या  विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावत अव्वल ठरली.
कोरोनाचे संकट अजून मोठं आहे ते आपण जिंकलं पाहिजे यासाठी सर्वांची साथ आवश्यक आहे असेही ते यावेळी म्हणाले. या स्पर्धेस मिळालेला बाळ-गोपाळांचा भरघोस प्रतिसाद आणि आत्मविश्वास वाखाणण्यासारखा आहे, अशा शब्दात आयुक्तांनी मुलांचे कौतुक केले.
 कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या” माझे कुटूंब, माझी जबाबदारी” या मोहिमे अंतर्गत याच विषयावर महापालिका क्षेत्रातील ५ वी ते १० वी या गटातील सर्व शालेय विदयार्थ्यांसाठी महापालिकेने आयोजिलेल्या ऑनलाईन वक्तृत्व व अभिनय स्पर्धेस महापालिका शाळांपासून इंटरनॅशनल स्कूल पर्यन्त अनेक शाळांतून  प्रचंड प्रतिसाद मिळाला असून यामध्ये सुमारे १२०० विदयार्थ्यांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या, महापालिकेने नियुक्त केलेल्या परिक्षक मंडळांने यापैकी ७८७ प्रवेशिका पात्र ठरवून त्यांचे अवलोकन करुन यामधून एकूण २०  विदयार्थी स्पर्धकांना अंतिम फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले. या  विदयार्थ्यांच्या गुरवारी झालेल्या अंतिम फेरीत तीन विजेते आणि तीन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या ओवी महाजन हिला ११ हजार रोख पारितोषिक आणि  स्मृतीचिन्ह, द्वितीय क्रमांक आयुषी देवस्थळी  ८ हजार रोख आणि स्मृतीचिन्ह, तृतीय क्रमांक गायत्री देव ५ हजार रोख आणि  स्मृतीचिन्ह, तर उत्तेजनार्थ पारितोषिक समय तांबे, ईशा अन्सारी, सिरत झोरा मसुर अन्सारी यांना प्रत्येकी २ हजार रोख आणि  स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 331 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.