सरपंच,उपसरपंच भेटले जिल्हा परिषद अध्यक्षांना

भेटीदरम्यान ग्रामपंचायत हद्दीतील प्रस्तावित व प्रलंबित कामांविषयी केली चर्चा

शहपूर : शहापूर तालुक्याच्या सोगाव गटातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सावरोली(सो)ग्रामपंचायतच्या सरपंच छाया निरगुडा व नवनिर्वाचित उपसरपंच मनीषा दवणे यांनी आज(दि.२३)ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन ग्रामपंचायत हद्दीतील प्रस्तावित व प्रलंबित कामांविषयी चर्चा केली.या वेळी अध्यक्षांनी सरपंच व नवनिर्वाचित उपसरपंच यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या क मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषद ही ग्रामपंचायतीच्या विकासाचा मुख्य कणा असून सरपंच व उपसरपंच या दोन्ही महिला पदाधिकार्यानी जिल्हा परिषद महिला अध्यक्षांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेतल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

44 total views, 1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *