मनसेच्या शिष्टमंडळाला पालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत, दुरुस्ती लवकरात लवकर करण्याचे दिले आश्वासन.
नवी मुंबई : सीवूड्स, सेक्टर ४६, ४६(अ) मधील पाम बीच रस्ता आणि सर्व्हिस रोड मधील उद्यानाची दुरावस्था झाली होती. तसेच ओपन जिम मधील साहित्यांची सुद्धा दुरवस्था झाली आहे. कोरोनाच्या काळात आपले आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी अनेक नागरिक येथे चालण्यासाठी येतात, तसेच अनेकांना ओपन जिम चा वापर करून व्यायाम करायचा असतो. पण दुरवस्थेमुळे हे करणे कठीण होऊन गेले आहे.
या संदर्भात महानगरपालिका उद्यान विभागाचे अधिकारी चंद्रकांत तायडे यांची मनसे शिष्टमंडळाने भेट घेतली आणि दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी विनंती केली. तायडे यांनी हि सकारात्मक प्रतिसाद देत, दुरुस्ती लवकरात लवकर करण्याचे आश्वासन दिले.
मनसेच्या या शिष्टमंडळात शहर सचिव सचिन कदम, विभागअध्यक्ष अमोल आयवले, उप विभागअध्यक्ष अप्पासाहेब जाधव, नरेश कुंभार, मयूर शिंदे हे उपस्थित होते.
503 total views, 1 views today