सर्वसामान्य महिलांना देखील सकाळी प्रवासाला परवानगी देण्याची मागणी

लोकल प्रवासामुळे सर्वसामान्य महिलांना दिलासा

कल्याण : आजपासून सर्व महिलांसाठी लोकल प्रवासाला मुभा देण्यात आल्याने महिला प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तब्बल ७ महिन्यानंतर लोकल प्रवास करायला मिळत असल्याचा आनंद या महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. सकाळी ११ नंतर सर्वसामान्य महिलांना रेल्वेत प्रवेश असल्याने सर्वसामान्य महिलांना देखील सकाळी प्रवास करण्याची परवानगी देण्याची मागणी यावेळी महिलांनी केली.
सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरु करावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. त्याचाच एक पहिला टप्पा म्हणून सर्व महिलांना लोकल प्रवसाला परवानगी देण्यात आली आहे. लोकल प्रवास सुरु झाल्याने आज कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात महिलांनी मोठी गर्दी केली होती. तिकीट काउंटर, रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलांची गर्दी दिसून आली. अनेक महिन्यांनी लोकल प्रवास करायला मिळणार म्हणून महिलांकडून आनंद व्यक्त केला जात होता. त्यापैकी अनेक महिला या ७ महिन्यानंतर पहिल्यांदा ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. तर लॉकडाऊनमूळे आपल्या नातेवाईकांकडे जाता न आल्याने काही जणी आपल्या आईला भेटण्यासाठी जात असल्याचे दिसून आले.
लोकल प्रवासामूळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलले होते. तर ११ नंतर सर्वसामान्य महिलांना परवानगी असल्याने सर्व महिलांना सकाळी देखील प्रवासाची परवानगी देत लोकल प्रवासाची वेळ बदलण्याची मागणीही यावेळी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. तर ११ नंतर कल्याण स्थानकात महिलांची तुरळक गर्दीच पाहायला मिळाली. 

 287 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.