नवी मुंबईतील इलठणपाडा,सुभाषनगर परिसरात शिवसेना, राष्ट्रवादीला धक्का

विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश

नवी मुंबई : प्रभाग क्रमांक २ आणि प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि समाजवादी पक्षाचा सुपडासाफ झाला असून माजी नगरसेवकांसह असंख्य कार्यकत्र्यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे इलठणपाडा, सुभाषनगर व परिसरात भाजपाची ताकद वाढली आहे.
आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर विष्वास ठेवून शिवसेना, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपाचा झेंडा हातात घेतला. सोशल डिस्टिंन्सिंग पाळत पार पडलेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात आ.नाईक यांनी या सर्वांचे स्वागत केले. या कार्यकर्त्यांचा भाजपात योग्य सन्मान राखला जाईल. माझ्या आमदारकीची अद्याप चार वर्षे बाकी असून या कालावधीत प्रभाग २आणि ५ चा कायापालट करू. पाणी, रस्ते, हाॅस्पिटल सर्व काही सुविधा निर्माण करू अशी ग्वाही दिली. आगामी निवडणुकीत नवी मुंबई पालिकेवर भाजपाचा झेंडा डौलाने फडकेल, असा विश्वास व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी आमदार संदीप नाईक, पालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती नविन गवते, माजी नगरसेवक अपर्णा गवते, माजी नगरसेवक दिपा गवते, समाजसेवक राजेश गवते, वीरेश सिंह, अनिल गवते, दामोदर कोटियन,चंद्रमा सोेनकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. माजी नगरसेवक किशोर गायकर, माजी नगरसेविका सुनिता पिंगळे, विशेष कार्यकारी अधिकारी पंढरीनाथ पाटील, माजी शाखाप्रमुख राजेश जैस्वाल, राष्ट्रवादीचे नागेश नाईक यांच्यासह अनेक कार्यकत्र्यांनी पक्षप्रवेश केला.
स्थायी समितीचे माजी सभापती नविन गवते यांनी या प्रसंगी विरोधकांवर निशाणा साधत प्रभागातील नागरिकांना भुलथापा देण्याचे दिवस सरल्याची आठवण त्यांना करून दिली. स्वतःच्या पक्षाचे नगरसेवक होते तरीदेखील या दोन प्रभागांना नागरी सुविधा पुरवू न शकणारे आता रहिवाशांना २७ माळयांच्या टाॅवरचे स्वप्न दाखवत असल्याचा आरोप केला. लोकनेते नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईचा विकास झाला असून राज्यात पहिले आणि देशात तिसऱ्या क्रमांकाचे शहर नवी मुंबई बनले आहे. या दोन्ही प्रभागांतून लोकनेते नाईक जे उमेदवार देतील त्यांना येथील नागरिक बहुमतांनी निवडून आणतील, अशी खात्री आहे.

 381 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.