विधानसभेच्या निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच शिवसेनेचा आवाज आज शहापूरात घूमला.
शहापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर भाजपाकडून वैयक्तिक टिका केली जाते.विरोधकांच्या या नितीभ्रष्ट राजकारणाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शहापूर तालूका शिवसेनेने उपजिल्हा संघटक संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.१९) सकाळी १० वाजता शहापूरात एल्गार मोर्चा काढला होता त्यात शेकडो
शिवसैनीक सहभागी झाले होते.विधानसभेच्या निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच शिवसेनेचा आवाज आज शहापूरात घूमला.
शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार जोमाने काम करीत आहे. अभूतपूर्व अशा कोरोना आपत्तीचा सामना मोठ्या धैर्याने करीत राज्याचा कारभार यशस्वीपणे हाकत आहेत.
कोरोना संसर्गाची परिस्थिती राज्यभर आटोक्यात आणण्यात आटोकाट प्रयत्न सुरू असतानाही भाजपा या विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेवर वैयक्तिक टिका केली जाते.विरोधकांच्या या नितीभ्रष्ट राजकारणाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे उपजिल्हा संघटक संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.१९) शहापूर तालूका शिवसेनेने विराट एल्गार मोर्चा काढला होता, यात शेकडो शिवसैनिकांनी टिकाकारांना त्यांच्याच भाषेत उत्तरे देऊन भावनांना वाट मोकळी करून दिली.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच शिवसेनेचा आवाज शहापूरात घूमल्याने शिवसेनेत नवचैतन्य संचारले आहे. समर्थन मोर्चाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे ,माजी आमदार पांडुरंग बरोरा ,तालुका प्रमुख मारुती धिर्डे,माजी तालुका प्रमुख काशिनाथ तिवरे,महिला जिल्हा संघटक रश्मी निमसे,माजी जी.प.अध्यक्ष मंजुषा जाधव, सभापती रत्नप्रभा तारमळे,पंचायत समितीच्या सभापती रश्मी नेमाने,नगराध्यक्ष रजनी शिंदे,तालुका संघटक अरुण कासार,ज्ञानेश्वर तळपाडे ,आकाश सावंत, उपतालुका प्रमुख विकास गगे, बाळू विशे,दत्ता ठाकरे, बंडू शृंगारपुरे,सुरेन्द्र तेलावणे,अविनाश साबळे, उपनगराध्यक्ष सुभाष विशे, माजी सरपंच गौतम गोडे,विजय देशमुख,शिक्षक सेना तालुका प्रमुख दिनकर सर ,युवासेना विधान सभा संघटक स्वानंद शेलवले,युवासेना तालुका अधिकारी मोहन कंठे ,प्रशांत चौधरी, सर्व पदाधिकारी युवासेना,महिला आघाडी पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.
गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत नाराज झालेले काही शिवसैनिक सुद्धा आजच्या एल्गार मोर्चात सहभागी होऊन शिवसेनेत सक्रिय झाल्याने अनेक जुन्या शिवसैनिकांनी आयोजकांचे कौतुक केले आहे
502 total views, 2 views today