राज्यातील १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

प्रविण दराडे, डॉ. अश्विनी जोशी, डॉ.कलशेट्टी, डॉ.सुधाकर शिंदे यांच्यासह अन्य जणांचा समावेश

मुंबई : राज्यावर कोसळलेल्या अतिवृष्टी संकटामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातील बहुतांष मंत्री असताना आज १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
यामध्ये ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रविण दराडे आणि त्यांच्या पत्नीं पल्लवी दराडे यांच्यासह अन्य १५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.
सनदी अधिकारी प्रविण दराडे यांची समाज कल्याण आयुक्त पदावरून बदली केल्यानंतर मधल्या काळात कोणतीच जबाबदारी देण्यात आली नव्हती. आता त्यांच्याकडे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या व्यवस्थापकिय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. तर त्यांच्या पत्नी पल्लवी दराडे यांची गृह खात्याचे सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे सुरक्षा आणि अपील हा विभाग देण्यात आला आहे.
तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीजच्या जयश्री भोज यांना आयटी विभागाच्या व्यवस्थापकिय संचालक पदी नियुक्ती देण्यात आली.
सनदी अधिकारी ए.आर काळे यांची बदली फूड अॅण्ड ड्रग्ज विभागाच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. अश्विनी जोशी यांची एमपीसीएल च्या व्यवस्थापकिय संचालक पदी नियुक्ती देण्यात आली.
डॉ. एम.एस.कलशेट्टी यांची नियुक्ती भूजल सर्व्हेक्षण विभाग पुणे येथे संचालक पदी नियुक्ती करण्यात आली.
आर.बी.भोसले यांची पुणे विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त पदावरून अहमदनगरच्या जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली. एच.पी.तुम्मोड यांची डेरी विकासच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली.
डॉ.डि.एच. कुलकर्णी यांची महापालिका प्रशासन विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. सनदी अधिकारी सी.के.डांगे यांची एड्स कंट्रोलच्या प्रकल्प संचालकपदी नियुक्ती देण्यात आली.
एम.बी. वारभुवन यांची महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. येथील डॉ सुधाकर शिंदे यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागात उपसचिव पदावर करण्यात आली.
आर.एस क्षिरसागर यांची कोकण विभागाच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली.
बी.बी. दांगडे यांची रायगड जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या अध्यक्ष पदावरून शुल्क प्राधिकरण समितीच्या सचिव पदी करण्यात आली.
तसेच आर.के.गावडे यांची नाशिक उपायुक्त पदावरून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली.

 308 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.