१८ महिन्याचे भाडे थकवल्याने रहिवाश्यांनी विकासकांच्या कार्यालयाला ठोकले टाळे

पुनर्विकासाच्या नावाखाली रहिवाशांची फसवणूक झाल्याने नागरिक संतप्त

ठाणे : वर्तक नगर येथे म्हाडा इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांना पुनर्विकासाच्या नावाने फसवून त्यांना महिन्याचे भाडे न देणाऱ्या खाजगी बिल्डरच्या विरोधात स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या अठरा महिन्यांपासून येथील रहिवाशांना एका खासगी बिल्डरने ठरल्याप्रमाणे भाडे दिले नाहीत. तब्बल दीडशे हुन अधिक रहिवाशांना भाड्यापासून वंचित राहावे लागले असल्यामुळे वर्तक नगर येथील विकासकांच्या कार्यालयासमोर रहिवाश्यांनी आंदोलन करून कार्यालयाला टाळे लावले.
वर्तक नगर येथे गेली ३० वर्ष येथील रहिवाशी म्हाडा इमारती मध्ये वास्तव्य करीत होते, २०१० मध्ये पुनर्विकासकरिता विकासक आणि सोसायटीमध्ये करार झाला. दरम्यान रहिवाश्यांना महिन्याचे भाडे ठरले असताना विकासकाने तब्बल १८ महिने भाडे थकवून ठेवले आहे. कोरोनाच्या काळात अनेक रहिवाशांवर उपासमारीची वेळ आली असून काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यातच भाडे थकल्यामुळे रस्त्यावर आल्याची वेळ येथील रहिवाश्यांवर आली असल्याचे प्रसाद भालेकर यांनी माध्यमांशी बोलतात सांगितले.
एकीकडे लॉकडाऊन मध्ये अनेकांचे व्यवसाय नोकऱ्या गेल्या तर दुसरीकडे उपासमारीची वेळ सध्या या बेघर लोकांवर आलेली आहे. सरकारने अशा इमारत व्यावसाईकांवर कारवाई करून सामान्य जनतेचे पैसे  द्यावे अशी मागणी करत आज म्हाडाच्या रहिवाशांनी आंदोलन करून आपली व्यथा मांडली. दरम्यान लवकरात लवकर विकासकाने पुढे येऊन न्याय मिळवून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी रहिवाश्यांनी दिला.

 440 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.