५०० ते ६०० रु क्विंटल भावाने खरेदी केलेला भात बोगस सातबारा, शेतकऱ्याचे नाव वापरून व्यापारी हाच भात आदिवासी विकास मंडळाच्या सचिवाच्या संगतमताने हमीभावात खरेदी करून शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचे व सचिवाचे उखळपांढरे करून घेत असल्याचा माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा आरोप, हमी भाव केंद्र सुरू करण्याची केली मागणी
शहापूर : मुरबाड शहापूर हे दोन्ही तालुके ९०% केवळ भात पिकांवर अवलंबून असल्याने सहा महिने कोरोनाच्या महामारीत मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांला हातातोंडाशी आलेल्या भातपिकाला परतीच्या पावसाने भुईसपाट केले. त्यातच आदिवासी विकास महामंडळाने हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू करावीत. सालाबाद प्रमाणे खाजगी व्यापारी मातीमोल भावात भात खरेदी केल्यानंतर भात खरेदी केंद्र सुरू होतात. व त्याचा फायदा व्यापाऱ्यांना होतो. यास्तव खरोखरच शेतकऱ्याला न्याय दयावा असे वाटत असेल तर हमी भाव केंद्र सुरू करण्याची मागणी भुमिपुत्र माजी आमदार पांडूरंग बरोरा यांनी केलीआहे.
ज्यावर प्रापंचिक गरजा भागविल्या जातात. ते एकमेव भात पिक खाजगी व्यापाऱ्याच्या घशात जाण्याअगोदर दिवाळी सणाआधी हमीभाव काटा लावावा. मागील वर्षी भात पिकांस १८६८ रु भाव देण्यात आला होता. परंतु या वर्षी परतीच्या पावसाने भात झोडपून काढले. कोरोनाच्या संकटात शेतकरी आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे कोलमडला आहे. त्यातच ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या प्रापंचीक गरजा असतात. त्यावेळेस हमी भाव केंद्र सुरू होत नाहीत व गरजे पोटी शेतकरी आपलं भात खाजगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात विकतात. व नंतर शेतकऱ्याची भात खरेदी करताना एकतर उशीर झालेला असतो. त्याला बारदान (पोती) हेतुपुरसकृत पणे वेळेवर दिली जात नाहीत. खरोखरच हमी भावाचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा असे वाटत असेल तर दिवाळीच्या अगोदर हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी. व आदिवासी विकास मंडळाने चालढकलपणा केल्यास उशीरा काटा लावल्याचे प्रयत्न केल्यास बरोरा यांनी अंदोलनाचा इशारा दिला आहे.नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यत शेतकऱ्याचं भात बाजारात येण्याच्या तयारीत
असते. शासकिय शेतीची कर्ज, घरगुती व्यवहार,मुलांच्या लग्नाच्या कार्याला भाताच्या विक्रीतुन प्रापंचिक गरजा भागविण्याच्या वेळेस हमीभाव खरेदी सुरू होत नसल्याने गरजवंत शेतकरी व्यापाऱ्याच्या घशात मातीमोल भावात धान्य विकून मोकळे होतात. ५०० ते ६०० रु क्विंटल भावाने खरेदी केलेला भात बोगस सातबारा, शेतकऱ्याचे नाव वापरून व्यापारी हाच भात आदिवासी विकास मंडळाच्या सचिवाच्या संगतमताने हमीभावात खरेदी करून शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचे व सचिवाचे उखळपांढरे करून घेतात. यास्तव नोव्हेंबर महिन्याच्या मोसमातच हमीभाव खरेदी केंद्र सुरू व्हावीत अशी मागणी शेतकरी वर्गकडून होत आहे.
778 total views, 1 views today