तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून नुकसान भरपाई मिळावी म्हणून २१९ गावांचे पंचनामे करण्याचे आदेश शहापुरच्या तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी महसूल, कृषि, व पंचायत समिती विभागाला दिले आहेत.
शहापूर : शहापुर तालुक्यात परतीच्या पावसामुळे कापलेल्या रोपांबरोबरच शेतातील उभे पीक पाण्यात झोपल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तातडीने दखल घेऊन शहापुरच्या तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी महसुल,कृषी आणि पंचायत समितीच्या विभागाला भातपिकाचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महसूल विभागाचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
तालुक्यात परतीचा पाऊस व बदलत्या वातावरणामुळे यापूर्वी भातपिकांवर पडलेल्या बगळ्या, करपा रोगामुळे शेतकरी चिंताक्रांत होताच ,पण काही दिवसापासून तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण संध्याकाळी पडणाऱ्या वादळी वाऱ्यासह पाऊस यामुळे कापलेल्या भात रोपाबरोबरच शेतातील उभे पीक पाण्यात झोपल्याने व या पिकाला मोड आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत शहापुरच्या तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून नुकसान भरपाई मिळावी म्हणून २१९ गावांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल, कृषि, व पंचायत समिती या विभागाला दिले आहेत. त्यानुसार महसुल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी यांनी तालुक्यात प्रत्यक्ष जागेकर शेतात जाऊन पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्याचे तहसीलदारांनी माहिती देतांना सांगितले.
518 total views, 1 views today