जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा निर्णय सुडबुद्धिचा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई : जलयुक्त शिवार या शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या योजनेची चौकशी करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकार ने घेतलेला निर्णय सूडबुद्धीने घेतलेला निर्णय आहे. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करायची असेल तर तत्कालीन महायुती सरकार मधील शिवसेनेच्या मंत्र्यांची सुद्धा चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
शिवसेनेने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा केली होती मात्र अजून त्या दृष्टीने कोणते एक तरी पाऊल महाविकास आघाडी सरकार ने टाकले आहे का? कधी करणार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा?
आता झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांची उभी पिके भिजून वाहून गेली आहेत. त्यांना तातडीने १५ लाखांची मदत शासनाने द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रामदास आठवले यांनी केली आहे.
591 total views, 1 views today